fbpx

आमची शेतकरी उत्पादक कंपनी तुमच्या अन्नप्रक्रिया उद्योगाला ३५% अनुदान मिळवून देणार आहे तेही अगदी विनाशुल्क (फ्री मध्ये)

फाईल तयार करण्यापासून ते अनुदान खात्यात जमा होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य शून्य रुपयात

कोकणात सरकारी अनुदानाच्या योजनांमधून प्रकल्प कमी का होतात ??

  1. गव्हर्मेंट च्या नक्की कोणत्या ऑफिस मध्ये माहिती मिळेल हेच माहित नसते. 
  2. ऑफिस मध्ये एका ठिकाणी सर्व माहिती मिळत नाही. 
  3. योजनेसाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती मिळत नाही. 
  4. आपल्याला ऑनलाइन ॲप्लीकेशन करता येत नाही. 
  5. ॲप्लीकेशन केल्यावर ते बरोबर केले आहे की नाही याची माहिती मिळत नाही.
  6. नेट कॅफे मध्ये ॲप्लीकेशन करून घ्यायला हजार दोन हजार रुपये खर्च येतो.
  7. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला पाच हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येतो.
  8. ॲप्लीकेशन केलं की योजना मंजुरी मिळण्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो.
  9. योजना मंजुरी मिळण्यासाठी सहा महिने ते वर्षभर वाट बघावी लागते.
  10. योजना मंजुरी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना तसेच एजंटना पैसे द्यावे लागतात.
  11. अनुदान खात्यात जमा होईपर्यंत खूप प्रकारे अडवणूक होते.
  12. बँकेतून लोन मिळवणे अवघड जाते. 

या सगळ्या अडचणींमुळे कोकणात प्रकल्प कमी होतात व इतर भागातील प्रकल्प जास्त होतात. 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या  केंद्र शासन सहाय्यित योजने मध्ये नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जा शी निगडीत अनुदान दिले जाते. 

या योजनेमधून अन्नप्रक्रिया उद्योगांकरिता एकूण प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त ३५% अनुदान उपलब्ध आहे. त्यामध्ये वैयक्तिक ला जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे.

सर्व जाती, धर्म, स्त्री, पुरुष, ग्रामीण, शहरी लाभार्थी यांना सर्वांना ३५% अनुदान आहे.

तुम्हाला नवीन उद्योग करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल किंवा कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल, तर त्या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा मिळेल.

ही योजना भारत सरकारची खूप महत्वाकांक्षी योजना आहे. आधीच्या योजनांमधून लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा अभ्यास करून असा त्रास होऊ नये यासाठी या योजनेची रचना केली आहे.

या योजने मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा फक्त 437 चा लक्षांक (टार्गेट) आहे. म्हणजेच प्रत्येक तालुक्यात सुमारे 50 प्रकल्प होतील. आणि येवढे सगळे फायदे व सहाय्य असल्यामुळे हे टार्गेट लगेच पूर्ण होईल.

तुम्हाला कोणताही फूड सेक्टर / अन्नप्रक्रिया उद्योग चालू करायचा असेल किंवा आधीचा उद्योग वाढवायचा असेल तर वेळ न घालवता लगेच खालील नंबर वर कंपनीशी संपर्क करा.

PMFME योजनेबद्दल थोडक्यात माहिती

🙏कोकणातील उद्योगांच्या वाढीसाठी कृपया हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांना व तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये पाठवा. तुमच्या व्हॉट्सॲप मधून या पेजची लिंक शेअर करण्यासाठी कृपया खालील बाटणवर क्लिक करा.🙏

आमच्या शेतकरी उत्पादक कंपनी चे व्हिजन -
कोकणातील शेतकऱ्यांना शेती व शेती पूरक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी मिळवून देणे. 

आणि आमच्या व्हिजन च्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही शेतमालावर आधारित १०० छोट्या अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रकल्प करण्यासाठी मार्गदर्शन आणि हँड-होल्डींग सपोर्ट देणार आहोत. 

या प्रकल्पासाठी संपूर्ण मार्गदर्शन पूर्णपणे मोफत असणार आहे.

कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढवून शेतमालाला चांगला दर मिळवून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

तुमच्या प्रकल्पासाठी कंपनी काय काय करणार ??

कोकण डेव्हलपमेंट ॲग्रो प्रोडूसर कंपनी तर्फे PMFME योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी खालील बाबींसाठी विनाशुल्क (फ्री मध्ये) सहाय्य करण्यात येईल.

या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यापासून अनुदान खात्यात जमा होई पर्यंत संपूर्ण सहाय्य कोकण डेव्हलपमेंट ॲग्रो प्रोडूसर कंपनीकडून विनाशुल्क केले जाते.

योजनेसाठी फाईल तयार करणे

योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करणे

विना तारण कर्जासाठी मार्गदर्शन करणे

योजनेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे

बँकेचा प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य करणे

तसेच उद्योग स्थापनेबाबत मार्गदर्शन करणे

उद्योग स्थापन झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करणे

पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या नियमात बसत असेल तर विना तारण कर्ज तसेच आण्णासाहेब पाटील योजनेमधून कर्जावरील व्याज परतावा मिळवण्यात सहाय्य करण्यात येईल.

PMFME योजनेची वैशिष्ट्ये

१. सर्व डॉक्युमेंट्स दिल्यावर जास्तीत जास्त २ आठवड्यात योजना मंजूर होते.

२. लाभार्थ्यांनी घरी बसून डॉक्युमेंट्स मोबाईल मध्ये स्कॅन करून पाठवायची आहेत.

३. योजना मंजूर करण्यासाठी कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही. कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या जागेवर येऊन सर्वेक्षण करतात.

४. योजना मंजूर करण्यासाठी कोणालाही कोणतीही फी किंवा पैसे द्यायची गरज नाही.

५. स्त्री/पुरुष, सर्व जाती, शहरी/ग्रामीण अशा सर्व लाभार्थ्यांना समान ३५% अनुदान.

PMFME योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा.

आम्ही तुमच्याशी लवकरात लवकर संपर्क करू.
सबमीट केल्यावर तुमच्या व्हॉट्सॲप मध्ये PMFME लाभार्थी मार्गदर्शन ग्रुप ओपन होईल कृपया तो ग्रुप जॉइन करा.

या योजनेतून करता येण्या सारखे प्रकल्प

1) काजू प्रक्रिया उद्योग

2) आंबा पल्प निर्मिती उद्योग

3) फणस वेफर्स उद्योग

4) कोकम सरबत / आगुळ निर्मिती

5) करवंद प्रक्रिया उद्योग

6) नारळ प्रक्रिया उद्योग

7) पापड उद्योग

8) पिठाची गिरणी

9) बेकरी उद्योग

10) खवा उद्योग

11) फरसाण उद्योग

12) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)

13) चकली / नमाकिन उद्योग

14) सीलबंद पाणि उद्योग 

15) लोणचे निर्मिती उद्योग 

16) हळद / मसाले निर्मिती उद्योग 

17) राइस मिल

18) चटणी – मसाला डंख

19) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग 

20) बिस्किट निर्मिती उद्योग 

21) पोहा निर्मिती उद्योग 

22) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग 

23) केक निर्मिती उद्योग 

24) चॉकलेट  निर्मिती उद्योग 

25) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग 

26) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग 

27) दलीया निर्मिती उद्योग 

28) डाळमिल 

29) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग 

30) पिठाची गिरणी 

31) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग

 32) फ्रुट ज्युस  निर्मिती उद्योग 

33) अद्रक – लसुण पेस्ट निर्मिती उद्योग  

34) हिंग निर्मिती उद्योग 

35) मध  निर्मिती उद्योग 

36) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग 

37) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग 

38) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग 

39) जैम व जेली निर्मिती उद्योग 

40) लिंबू शरबत निर्मिती उद्योग 

41) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग 

42) पाम तेल निर्मिती उद्योग

43) पनीर/चिज निर्मिती उद्योग 

44) पास्ता निर्मिती उद्योग 

45) आलू चिप्स निर्मिती उद्योग  

46) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग 

47) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग 

48) सोया चन्क निर्मिती उद्योग 

49) सोया सॉस निर्मिती उद्योग 

50) शुगर कँडी निर्मिती उद्योग 

51) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग 

52) इम्लीपल्प निर्मिती उद्योग 

53) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग 

54) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग 

55) विनेगर निर्मिती उद्योग 

56) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग

तसेच कृषीमालावर आधारित इतर कोणताही अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करता येईल.